यावल : भुसावळ रस्त्यावरील अपुर्वम हॉटेल शेजारील विजय गणपत बारी यांच्या प्लॉटमधील सुमारे 20 हजार रुपयाचे शेती साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी शुक्रवारी विजय बारी यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.