आरोपी पसार : वनविभागाच्या गस्ती पथकाची कारवाई
यावल- सागवानी लाकडाच्या चौकटींची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर यावल वनविभागाच्या गस्ती पथकाने हडकाई नदीवर मंगळवारी पहाटे सापळा रचला मात्र आरोपी दुचाकीसह 20 हजार रुपये किंमतीच्या 11 सागवानी चौकटी टाकून पसार होण्यात यशस्वी झाला. ही कारवाई यावल गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनरक्षक रवींद्र पवार, वनरक्षक संदीप पंडित, शिपाई सचिन तडवी, वाहन चालक आनंद तेली आदींच्या पथकाने केली.