यावलमध्ये 24 तासात दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू

0

यावल : शहरातील तिरुपती नगरातील 45 वर्षीय भाजीपाला विक्रेत्याचा बुधवारी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा गुरूवारी पहाटे शहरातील पुर्णवाद नगरातील 58 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 24 तासात शहरातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने शहरवासीयांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून नागरीकांना घरातच राहण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.