यावलमध्ये 78 लाख खर्चातून ज्येेष्ठांसाठी सभागृह होणार

0

यावल । शहरातील ज्येेष्ठ नागरिकांच्या सभागृहासह इतर चार कामांसाठी 78 लाख 19 हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ही कामे मार्गी लावण्यासाठी तत्कालिन नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी पुढाकार घेतला होता.

वैशिष्ट्यपूणर्र् योजनेतून 78 लाख 19 हजार 113 रुपयांच्या विविध कामांना जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात शहरातील जेष्ठ नागरिक संघासाठी सभागृह बांधकाम (27 लाख 25 हजार), चोपडा रस्त्यावर नदीकाठी महिला आणि पुरूषांसाठी दोन स्वतंत्र सार्वजनिक शौचालये (प्रत्येकी 17 लाख 63 हजार), पालिका संचलीत साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात प्रसाधनगृह 15 लाख 65 हजार) आदी कामांचा समावेश आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल. ज्येेष्ठ नागरिकांना आता हक्काची जागा मिळाल्याचा आनंद आहे. ही जागा मिळावी, यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष अतुल पाटील यांना जेष्ठ नागरिक संघातर्फे साकडे घातले होते. यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर नगराध्यक्ष पाटील यानीं शब्द पाळला.