यावल- यावल-रावेर येथील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शहरात शुक्रवारी भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर होत आहे. भुसावळ रस्त्यावरील श्री कलेक्शनजवळ होणार्या शिबिरात गरजू रूग्णांची नेत्र तपासणी विनामूल्य केली जाणार असून शस्त्रक्रियेकरीता जळगावस्थित कांताई नेत्रालय येथे नेण्या – आणण्याची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. रूग्णांकरीता राहण्याची भोजनाची व अल्पोहार-चहाची मोफत व्यवस्थाही करण्यात आली. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी केले आहे. नाव नोंदणी करीता शुभम देशमुख, स्नेहल फिरके, रीतेश बारी, मनोज बारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आयोजक कळवतात.