यावलला ईव्हीएम बंद : 45 मिनिटे मतदार ताटकळले

0

यावल : शहरात आज सकाळी सात वाजेपासून सर्व मतदान केंद्रावर मोठा उत्साह दिसून आला. प्रत्येक मतदार स्वेच्छेने मतदान केंद्रावर मतदानासाठी शांततेने येताना तसेच रांगेत नंबर लावताना दिसून आले. अनेक मतदारांच्या घरी मतदान केंद्र व यादी भाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, यादी भागाचे नावाची चिठ्ठी संबंधित काही बीएलओ कर्मचाऱ्यांनी घरपोच न केल्याने मतदारांना मोठी भटकंती करावी लागत असल्याचे सुद्धा दिसून आले. यावल शहरातील बालसंस्कार विद्यामंदिरातील मतदान केंद्रातील उत्तरेकडील खोलीतील ईव्हीएम मशीन सुरुवातीलाच सुमारे 45 मिनिटे सुरू न झाल्याने तसेच पर्यायी व्यवस्था करण्यास एक तास लागल्याने मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. नवीन तथा दुसरे ईव्हीएम मशीन आणल्यावर मतदान सुरू झाले.