यावलला उद्या भैय्युजी महाराजांच्या अस्थीकलशाचे आगमन

0

यावल- अध्यात्मीक संत गुरू भैय्युजी महाराज यांच्या अस्थी कलशाचे भुुसावळ येथून 24 जुलै रोजी दुपारी चार वाजता यावल शहरात आगमन होत आहे. शहरासह परीसरातील भाविकांच्या दर्शनासाठी महाराजांचा अस्थी कलश यावल तालुका सह. जिनींग व प्रेसींग संस्थेच्या सभागृहात ठेवण्यात येणार आहे. शहर व परीसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा.मुकेश येवले, प्रा.संजय कदम यांनी केले आहे. सायंकाळी सहा वाजता महाराजांच्या अस्थी कलशाचे तालुक्यातील किनगावकडे प्रस्थान होणार आहे. किनगाव स्टेट बँकेच्या जवळील राजेंद्र एकनाथ पाटील (आर. ई. पाटील सर) यांच्या निवासस्थानी अस्थी कलश व शिष्यगणांचा मुक्काम राहणार आहे. किनगाव व परीसरातील भाविकांनी किनगाव येथे दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर.ई.पाटील सर, पंचायत समिती उपसभापती उमाकांत (आबा) रामराव पाटील, किशोर पाटील व शिष्यगणांनी केले आहे. तालुक्यात श्री संत भैय्युजी महाराजांचे शिष्य मोठया प्रमाणात असल्याने आणि अनेकांना इंदोर येथे जावून महारांजाचे अंतीम दर्शन घेणे शक्य न झाल्याने सर्व गुुरुबंधुंना महाराजांचे अंतीम दर्शन तालुक्यात घडणार आहे. 25 तारखेस सकाळी अस्थी कलशाचे किनगाव येथून चोपडा-अमळनेर कडे प्रस्थान होणार आहे.