यावलला एकाकडून छऱ्याची बंदूक जप्त

0

यावल– शहरातील खाटीक वाड्यातील एका तरूणाकडे रिव्हाल्वर असल्याच्या गोपनिय माहिती वरून शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला. मात्र, आढळून आलेली पिस्तोल ही छऱ्यांची असल्याचे समोर आले आहे. सदरील तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु, रिव्हाल्वर मिळाल्याच्या अफवेने शहरात खळबळ उडाली होती.

शुक्रवारी रात्री शहरातील अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत असलेल्या खाटीक वाडा आहे. या भागात एक तरूण आपल्या भावासोबत राहतो. तो गावठी बनावटीचे रिव्हाल्वर बाळगतो, अशी गुप्त माहिती यावल पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांना मिळाली. त्यावरून शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हवालदार गोरख पाटील, रा.का. पाटील सह पोलिसांचा मोठा ताफा खाटीक वाड्यात दाखल झाला. सिने स्टाईल संशयीत तरूणाच्या घराच्या चौही बाजून सापळा लावण्यात आला व तरूणाचे दार ठोठावण्यात आले. तेव्हा झोपेतून उठत तरूणाने जसे दार उघडले तसे त्याच्यावर हवालदार गोरख पाटील झपाटले व तीन पोलिसांनी त्या जकडले व घराची तपासणी करीता त्याच्या कडे रिव्हाल्वर विषयी विचारणा केली, तेव्हा सदरील तरूणाने अजमेर (राजस्थान) मधुन छऱ्रे उडवणारी पिस्तोल पोलिसांनी काढून दिली. रात्री १० वाजेला पोलिसांचा मोठा ताफा, अचानक पणे केले गेलेले सर्च ऑपरेशन मुळे शहरात ही खबर वाऱ्या सारखी पसरली व पोलिसाठाण्यात गर्दी जमू लागली तर रात्री शहरात रिव्हाल्वर सापडल्याचे अफवेने एकचं खळबळ उडाली होती.

छऱ्रे उडवणारी पिस्तोल…
मिळालेल्या माहितीची पडताळणी करतांना दक्षता घेत पोलिसांनी सदरील कारवाई केली व त्या तरूणास ताब्यात घेत पिस्तोल हस्तगत केले आहे, पुर्ण खात्री व अजुन त्या तरूणाची सखोल चौकशी अंती पोलिस पुढील निर्णय घेतील असे सांगण्यात आले आहे.