यावलला किरकोळ कारणावरून दाम्पत्याला मारहाण ; तिघांवर गुन्हा

यावल : शहरातील मोची वाडा येथे नगरपालिकेचा नळ लावल्याच्या कारणावरून पत्नीसह तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नळ कनेक्शन लावण्याच्या कारणावरून वाद
प्रवीण मगनलाल नारेकर (40, रा.बुरूज चौक, मोची वाडा, यावल) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात व मजूरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेजारी राहणारा रमेश देवराम हानवते याने नळ कनेक्शन लावल्याच्या कारणावरून प्रवीण नोरकर याला धारदार शस्त्राने नाकावर वार करून जखमी केले तर प्रवीण यांच्या पत्नीला सुशीला रमेश हानवते आणि लिलाधर देवराम हानवते (सर्व रा. मोचीवाडा) यांनी दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी प्रवीण नारेकर यांनी यावल पोलिसात तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी रमेश देवरात हानवते, सुशीला रमेश हानवते आणि लिलाधर देवराम हानवते यांच्या विरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.