यावल : शासकीय गोडावूनच्या पाठीमागील येथील नितीन वसंत महाजन यांच्या शेतातील सुमारे एक हजार पिल बाग केळीची खोडे चोरटयांनी कापून शेतमालकाचे सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान केले. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. येथील शासकीय गोडावूनच्या पाठीमागील आगवान नावाचे शेत आहे, भुसावळ येथील स्वामी नारायण गुरूकुलचे शास्त्री यांचे ते मालकीचे असून येथील नितीन वसंत महाजन यांनी बटाईने केले आहे. सोमवारी सायंकाळी शेतमालक शेतात गेले असता त्यांना केळीचे सुमारे एक हजार झाडे कापून एक जण बैलगाडीने घेवून जात असतांना दिसले. गेल्या तीन- चार दिवसापासून केळीचे झाडे कापली जात असल्याचे दिसून आले. महाजन यांनी गाडीवानास रोेकले असता बैलगाडी जागेवर सोडून तो पळून गेला आहे. शेतमालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत बैलगाडी व बैल पोलीस ठाण्यात आणले या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.