यावल- वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणार्या ट्रकसह तीन ट्रॅक्टरांना यावल तहसीलच्या महसूल विभागातील गस्ती पथकाने ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. तहसीलदार कुंदन हिरे यांनी नेमलेल्या महसूलच्या गस्ती पथकाने शनिवारी अवैध गौणखनिज वाहतूक करणार्या वाहनधारकांवर कारवाई करीत वाहने जप्त केली. वाळूचे मक्ते बंद झाल्यानंतरही अवैधरीत्या वाहतूक होत असताना कारवाई करण्यात आली. शनिवारी पथकातील मंडळाधिकारी सचिन जगताप, ई.व्ही.महाडीक, बी.एम.पवार, आर.डी.पाटील, तलाठी एम.एच.तडवी, शरद पाटील, एफ.एस.खान, एस.व्ही.सूर्यवंशी यांनी गणेश शिवाजी पाटील यांच्या मालकीच्या ट्रक (एम.पी. 04-जीए.1436) जप्त केला तसेच बाळू नामदेव तायडे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एम.एच.19 सी.बी.3152), लिलाबाई भिकन कुंभार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एम.एच.27-4778) व विजय प्रकाश कुंभार यांचे ट्रॅक्टर (एम.एच.19-बीजी.1416) जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.