यावलला जुगाराचा डाव उधळला ; नगरसेवकासह 12 आरोपी जाळ्यात

0

सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त ; एएसपी नीलोत्पल यांची धडाकेबाज कारवाई

भुसावळ : यावल शहरातील वीटभट्टी जवळील केळीच्या शेतात खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह पथकाने धाड टाकून नगरसेवक अभिमन्यू विश्‍वनाथ चौधरी यांच्यासह 12 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 76 हजार 990 रुपयांच्या रोकडसह 38 हजार रुपये किंमतीचे 11 मोबाईल फोन तसेच तीन लाख 10 हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईने जुगार्‍यांमध्ये खळबळ उडाली. एकूण पाच लाख 24 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांचा कारवाईत सहभाग
यावलमधील जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी आदेश दिल्यानंतर एएसपी नीलोत्पल, नशिराबादचे उपनिरीक्षक अशोक खरात, नाईक चेतन पाटील, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, राजेश काळे, मो.अयाज खान, समाधान पाटील, जुबेर शेख, हर्षल पाटील यांच्यासह आरपीसी कर्मचार्‍यांनी सापळा रचून कारवाई केल्याने खळबळ उडाली.