यावल-: शहरातील फैजपुर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरा – समोर धडक होत तीन जण जखमी झाले. दुचाकी (क्रमांक एम. एच. १९ एक्स ९१५०) व्दारे अय्युब फतरू तडवी (५२) हे रिना अरमान तडवी (१७) व मुस्कान अय्युब तडवी (१८) यांना घेवुन शहरात येत होते तर पेट्रोल पंपावरून दुचाकी (क्रमांक एम. एच. ०१ ए. एस. ७०९६) वरून अज्ञात व्यक्ती भरधाव वेगात आला व दोघं दुचाकींची समोरा-समोर धडक झाली यात वरील तिघं जखमी झाले. ग्रामिण रूग्णालयात डॉ. दिनेेश देवराज, डॉ. रश्मी पाटील प्रथमोपचार केले. यात मुस्कान हिच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने व अय्यूब तडवी यांच्या पायाचे हाड मोडल्याने दोघांना जळगाव येथे हलवण्यात आले आहे.