यावल- फैजपूर रस्त्यावर पीरबाबा दर्ग्याजवळ दुचाकीचा अपघात होवून नारायण सोमा वारूळकर (रा.देशमुख वाडा, यावल) व अजय गोपाल अहिरे (15, रा.यावल) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात मंजुषा कोळेकर, विजय शिंदे यांनी प्रथमोपचार करून जळगाव हलवले. राजेंद्र भास्कर कोळी (60, रा.दगडी मनवेल) यांनी दुपारी तीन वाजेला कुठलेतरी विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तत्काळ यावलला प्रथमोपचार करून जळगाव येथे हलवण्यात आले.
तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
शहरातील सुनंद नगरातील सुनंदा विनोद पारधे (20) यांनी देखील शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरात फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले. विरावली येथील धोंडू नवल पाटील (50) यांनी घरातील उंदीर मारण्याचे औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर यावलला उपचार सुरू आहे.सावखेडासीम येथील साई मुकेश पाटील या पाच वर्षाच्या बालकास त्याचे वडील मुकेश पाटील यांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. त्यांच्या डोळ्यास व डोक्यास जबर मार लागला असून तो गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव हलवण्यात आले आहे.