यावलला पाडवा पहाट कार्यक्रम रंगला

0

यावल- खान्देश ट्रेडर्सतर्फे आयोजित दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहाटे संगीतमय पाडवा पहाट कार्यक्रम आमदार हरीभाऊ जावळे यांच्यासह तालुक्यातील शेकडो स्त्री-पुरुषांच्या उपस्थितीत चांगलाच रंगला. खान्देश ट्रेडर्स फर्मसमोर आकाशवाणी कलावंत प्रभूदत्त मिसर रावेर यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत उपस्थित रसिकांची मने आकर्षित करणारे सुंदर, गोड भावगीते अभंग, भक्तीपर्व गीते सादर करून रसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळविला. कार्यक्रमात सरोज प्रमोद कोळंबे यांनी एक सुंदर चारोळी म्हणून सर्वांचे लक्ष केंद्रित केले. दीपप्रज्वलन आमदार हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, अन्नपूर्णा पतसंस्था चेअरमन चंद्रकांत चौधरी, दीपक सराफ, नगरसेवक दीपक बेहडे, नितीन महाजन, प्रमोद नेमाडे, उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, हरीभाऊ कुलकर्णी, विजय सराफ, नगरसेवक तथा डॉ.कुंदन फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण बापू चौधरी, गोपाळ पाटील, महेश बयाणी, अमोल भिरुड, डॉ.निलेश गडे, सेवानिवृत्त तलाठी, शिक्षक, इत्यादी स्री-पुरूष रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी खान्देश ट्रेडर्सचे संचालक प्रमोद कोळंबे यांनी उत्कृष्ट नियोजन करून उपस्थित सर्व रसिकांना गोड दुध दिले.