यावलला बंद घर फोडत 15 हजाराची रोकड लांबविली

यावल : शहरातील विरार नगरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून 15 हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पा विजय अहिरराव (58, रा. विरार नगर, यावल) ह्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत. आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. कामाच्या निमित्ताने त्या घराला कूलूप लावून 9 फेब्रुवारी रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले आणि 15 हजार रूपयांची रोकड लांबविली. शनिवार, 19 फेब्रुवारी पुष्पा अहिरराव ह्या घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. याबाबत त्यांनी सायंकाळी 5 वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.