यावलला बनावट दारु कारखाना उद्ध्वस्त ; एकास अटक

0

यावल :- शहरातील हरि ओमनगरातील बनावट दारुच्या कारखान्यावर पोलीस पथकाने धाड टाकून २१० लिटर रसायन, दारुच्या रिकाम्या बाटल्या व अन्य साहित्य जप्त केले. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली. आकाश चोपडे असे  आरोपीचे नाव असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून चोपडे याचा हा गोरख धंदा सुरु होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. बी. पवार, दुय्यम निरीक्षक इंगळे हे देखील पथकासह आले आहेत.