यावलला बेकायदा दारूची वाहतूक : अडीच लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक

यावल : शहरातील बुरूज चौककडून विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणार्‍या चारचाकी वाहनासह तिघांच्या यावल पोलिसांनी मुसक्या आवळत एक लाख 52 हजार 880 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अतुल अरुण मानकर, शुभम नरेंद्र मावळे (दोन्ही रा.पिंपळगाव, ता.जळगाव जामोद) व निलेश सुभाष बेलदार (रा.दापोरा, ता.जि.बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली.

बेकायदा दारुची वाहतूक करताना कारवाई
यावल शहरातून शिरपूरकडून मध्यप्रदेशात विनापरवाना देशी दारूची वाहतूक करताना चारचाकी (एम.एच. 01 बी.डी9124) वाहनावर सोमवारी रात्री सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, सहाय्यक फौजदार असलम खान, हवालदार बालक बार्‍हे, सुशील घुगे, राहुल चौधरी, निलेश वाघ बुरूज चौकात कारवाई केली. कारच्या डिक्कीत दोन हजार 880 रुपये किंमतीच्या टँगो पंच या देशी दारूच्या 48 बॉटल्या आढळून आल्यानंतर त्या जप्त करण्यात आल्या व वाहनासह संशयीतांना ताब्यात घेवून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांचय मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.