यावलला मंत्री नवज्योतसिंग सिद्धूच्या प्रतिमेला फासले काळे

0

पाकिस्तान भेटीचा भाजयुमो पदाधिकार्‍यांनी केला निषेध

यावल- भारतावर नेहमी दहशतवादी हल्ले करून तसेच सीज फायरचे उल्लंघण करणार्‍या पाकिस्तानी सेनाध्यक्ष वाजवा यांची मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी गळाभेट घेतली आणि त्याचबरोबर भारताचे अभिन्न अंग असलेल्या विवादास्पद राष्ट्रपती मसुद खान यांच्यासोबत बसल्याचा यावलमध्ये भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी निषेध करीत सिद्धू यांच्या प्रतिमेला चप्पल-बुट मारून तसेच काळे फासून निषेध केला.

यांची होती उपस्थिती
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी, भाजपा वैद्यकीय आघाडीचे तालुका उपाध्यक्ष डॉ.कुंदन फेंगडे, युवा मोर्चाध्यक्ष लहू पाटील, सरचिटणीस योगेश साळुंके, राहुल बारी, भाजपा शहर सोशल मीडिया सेल अध्यक्ष स्नेहल फिरके, व्यंकटेश बारी, रीतेश बारी, हेमंत फेगडे, सुनील फेगडे, नदीम राजा खाटीक, अजनार राजा, दर्शन चौधरी, मनोज बारी, कल्पेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.