यावल :- मनवेल ता यावल येथील तरुण मुलांनी मतदार यादीत नाव नोंदणी करूनही मतदान ओळखपत्र वाटप करण्यात येत नसल्याची तक्रारी तरुण वर्गातुन होत आहे. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यांत आला यादिवशी मतदानकार्ड वाटप होईल, या आशेने तरुण मतदार ग्रा.पं.कार्यलयात गेली मात्र मतदान ओळखपत्रा आले नसल्याची माहीती बी.एल.ओ. तथा ग्रामसेवक यांनी सांगितले. मनवेल येथे मतदान केंद्र दोन आहे.
एका केंदाचे मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आली. मात्र ग्रामसेवक मतदान ओळखपत्र का? वाटप करीत नाही अशा प्रश्न मतदारामध्ये उपस्थित होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढ करण्यांसाठी शासना विविध जनजागृती उपक्रम राबवित आहे माञ मनवेल येथील ग्रामसेवक बिएलओचे काम स्वतःह करीत नसून शिपाई मार्फत करीत असल्यामुळे ग्रामथांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नवीन तरुण युवा मतदारांनी नोव्हेंबर महिन्यात नाव नोदंणी केली असुन अद्यापही मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आलेले नाही.