यावलला महिलेचा विनयभंग ; एकाविरूद्ध गुन्हा

0

यावल- शहरातील एका भागातील 26 वर्षीय महिलेचा दुसर्‍यांदा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात खिर्णीपुरा भागातील रहिवासी अल्ताफ खान मुस्ताक खान विरुद्ध गुन्हा दाखल झाला. पहिल्यांदा झालेल्या प्रकाराची बदनामीपोटी वाच्यता न केल्याने बुधवारी संशयित अल्ताफ खान याने महिलेचा पुन्हा विनयभंग केला. तिने आरडाओरड केल्याने तिची बहिण व मेहुणेे धावून आले. त्यामुळे संशयिताने पळ काढला. तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील करत आहेत.