यावलला मालवाहू रीक्षा उलटली : चार जण गंभीर,

0

यावल- राजुर्‍याहून यावलकडे येणारी खाजगी मालवाहू रीक्षा शहरातील भुसावळ नाक्यानाक्याजवळ उलटल्याने चार जण गंभीर जखमी झाले तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात शेख रऊफ शे.अब्दुल्ला (यावल) यांच्या हाताचा अंगठा कापला गेला तर शंकर गणेश चावदस यांचा हात फ्रॅक्चर होवून आकाश सोनवणे यांच्या डोक्याला मुका मार तसेच हर्षल समाधान कोळी (तिन्ही रा.निमगाव) यांचा हात फ्रॅक्चर झाला. मालवाहू रीक्षाचे चालक नजीरूद्दीन तडवी यांना किरकोळ जखमा झाल्या.