यावल– मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी 11 वाजता यावल शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. ‘मिशन मुस्लीम आरक्षण, अभी नहीं तो कभी नही’ असा नारा देत 11 वाजता आठवडे बाजारापासून मोर्चाला सुरुवात झाली. सुदर्शन चौक ते बाबुजीपुरा नगीना चौकमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चेकरी धडकले. हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्रीत आल्यानंतर तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.