यावल- चोपडा रोडवरील एच.पी.पंपाबाहेर 11 रोजी यावल युवक काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील व जिल्हा महासचिव डॉ.शोएब पटेल यांचा प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. रावेर विधानसभा अध्यक्ष अलिम शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधी घोषणा दिल्या. युवक काँग्रेस पदाधिकार्यांनी पेट्रोल व डिझेल दरवाढ कशी फसवी आहे ? पेट्रोल भरायला आलेल्या लोकांना समजावून सांगितले. या आंदोलनात नगरसेवक असलम शेख, शहराध्यक्ष कदीर खान, आरीफ खान, अजहर शेख, हर्षल दानी, नईम शेख, शमी बाबा, जुनेद शेख शेख इरफान, राजु पिंजारी, इम्रान खान, शोएब शेख, साजीद शेख तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.