यावलला राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

0
यावल : यावल तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे रास्ता रोको व धरणे आंदोलन शुक्रवारी दुपारी एक वाजता यावल टी पॉईंट व बुरुज चौकामध्ये करण्यात आले. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, वीज बिल माफ करावे, कपाशीवरील बोंडअळी नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी तसेच वाढत्या गॅस, डिझेल व पेट्रोलच्या दरात कपात करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. प्रसंगी यावल तालुकाध्यक्ष मुकेश येवले. शहराध्यक्ष करीम मन्यार, शेख कुरबान, कामराज घारु, देवकांत पाटील, सुरेखा पारधे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.