यावलला लोकनियुक्त नगराध्यक्ष साठी सक्षम उमेदवार देणार : आमदार शिरीष चौधरी
काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती : 54 उमेदवारांचे अर्ज
यावल : आगामी नगरपालिका निवडणुकीकरीता काँग्रेस पक्षाकडून सक्षम उमेदवार देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार शिरीष चौधरी यांनी केले. ते शहरात नगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी शहरातील विविध प्रभागातून 54 इच्छुकांचे अर्ज काँग्रेसकडे प्राप्त झाले आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. यात काँग्रेसच्या वतीने इच्छुक उमेदवारांची मुलाखतीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते. या बैठकीत बोलतांना त्यांनी सांगितले की, आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरीता सक्षम उमेदवार देण्यात येईल. प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणासह नगरपालिकेच्या सर्व प्रभागात आपले पक्ष संघटन मजबुत करण्याच्या दृष्टीने कामाला लागावे, अशा सूचना केल्या. या बैठकीत नगरपालिकेच्या विविध प्रभागातून उमेदवारी मिळावी म्हणून तब्बल 54 इच्छुकांनी आपापल्या परीचयाचे अर्ज सादर केले आहेत. या सर्व उमेदवारांसंर्दभात पक्षाच्या कार्यकर्त्यांसह वरीष्ठ पदाधिकारी सोबत चर्चे अंती निर्णय घेतला जाईल, असे आमदार चौधरी यांनी सांगितले.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, शहराध्यक्ष कदीर खान, माजी नगरसेवक सय्यद युनूस, पुंडलिक बारी, गुलाम रसूल शेख, करीम काझी, शेख असलम शेख नबी, मनोहर सोनवणे, शेख जाकीर, समीर खान, अनिल जंजाळे, इम्रान पहेलवान, शेख अय्युब कालू मास्टर, नईम शेख, विक्की गजरे, रशीद मन्यार, शेख वासीम, अशफाक शाह, शेख सकलेन, सईद शाह, शेख जाकीर, मिर रेहान सय्यद, रहेमान खाटीक आदींची उपस्थिती होती.