यावलला विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

0

यावल- शहरातील भिल्लवस्तीतील एका 30 वर्षीय विवाहितेने विषारी द्रव्य प्राशण करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. मंगलाबाई संजय भिल्ल असे मयत विवाहितेचे नाव आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकार्‍यांअभावी मृतदेह तब्बल चार तास येथे पडून होता. शहरातील बोरावल गेट भागात भिल्ल वस्ती असून तेथील रहिवासी सुनंदाबाई सोमा भिल यांनी दिलेल्या खबरी नुसार त्यांची विवाहित मुलगी मंगलाबाई संजय भील (30) ही तीन मुलांसह त्यांच्या घरी राहते. शनिवारी दुपारी तिने विषारी द्रव्य प्राषण केल्याचे साडेतीन वाजता उघडकीस आले. मंगलाबाई यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल केले असता डॉ.कमलेश पाटील, डॉ.अभिजीत नन्नवरे, डॉ.शबाना तडवी यांनी तिच्यावर शर्थीचे उपचार सुरू केले मात्र मोठ्या प्रमाणावर विषारी औषधी सेवन केल्याने काही वेळातचं त्यांची प्राणज्यात मालावली. यावल पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुमीत ठाकरे, हवालदार गोरख पाटील करीत आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात कायम वैद्यकीय अधिकारी पद रीक्त आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांअभावी दुपारी चार वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत मृतदेह विच्छेदनाअभावी पडून होता. रात्री डॉ.फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन केले.