यावलला शॉर्टसर्किटने टेलरींग दुकानाला आग

0

70 हजारांचे नुकसान ; कपड्यांसह शिलाई मशीन जळून खाक

यावल- शहरातील बुरूज चौक, खिर्नीपुरा भागातील मेहमूद टेलर यांच्या दुकानाला बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याने सुमारे 70 हजारांचे नुकसान झाले. मेहमुद टेलर हे रात्री नऊ वाजता मशीदीत नमाज अदा करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी दुकानाचे शटर बंद केले. यावेळी दुकानासमोर बसलेल्या काही तरुणांना टेलरींग दुकानातून धूर निघताना दिसल्याने त्यांनी आरडा-ओरड करताच रस्त्यावरून जाणार्‍या उपनगराध्यक्ष मुकेश येवले यांनी धाव घेतली. एव्हाना दुकानातील आगीने जोर पकडल्यानंतर शिवलेले कपडे, काऊंटर तसेच शिलाई मशीन जळून खाक झाले. नगरपरीषदेच्या बंबाला पाचारण करण्यात आले मात्र तो पर्यंत 60 ते 70 हजारांचे नुकसान झाल्याचे मेहमूद टेलर यांनी सांगितले.