यावलला सट्ट्यावर धाड : एकास अटक

0

यावल- शहरातील आझाद नगरात जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी सट्टा-जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकत इस्तीयाक शेख इदान यास अटक करून दोन हजार 520 रूपयांच्या रोख रक्कमेसह सट्टा-जुगाराचे साहित्य जप्त केले. गुन्हे शाखेचे हवालदार श्रावण पगारे यांच्या फिर्यादी वरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोेलिस निरीक्षक योगेश तांदळे करीत आहेत.