यावलला हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

0

यावल:- शासनाच्या हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ सोमवारी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते काटापूजनाने झाला. जळगांव जिल्हा कृषी औद्योगिक संस्था जळगांवतर्फे यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आमदारांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आला. ऑनलाईन नोंद केलेल्या कोरपावली येथील हरभरा उत्पादक शेतकरी विजय रामदास फेगडे यांना शाल श्रीफळ टोपी देवून प्रत्यक्ष हरभरा मोजणीस प्रारंभ झाला.

यांची होती उपस्थिती
यावल कृउबा सभापती भानुदास चोपडे, उपसभापती कांचन फालक, कृउबा माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी, नारायण बापू चौधरी, शेतकरी विजय रामदास फेगडे यांची उपस्थिती होती. जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेचे व्हा.चेअरमन संजीव पाटीत, रामनाथ चिंधु पाटील, रमेश जगन्नाथ पाटीत, मॅनेजर विश्वनाथ पांडुरंग पाटील या ठिकाणी कामकाज पाहणारे व्ही.एन.साळुंके, सह कृउबा संचालक डॉ.नरेंद्र कोल्हे, मुन्ना पाटील, राकेश फेगडे, सुनील बारी, पुंजोशेठ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख कडू पाटील, शरद कोळी, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील (राजपूत) आदी उपस्थित होते.

484 शेतकर्‍यांची नोंदणी
तालुक्यातील 484 शेतकर्‍यांनी हरभरा ऑनलाईन नोंदणी केली असून नोंदणी केलेल्या शेतकरी वर्गानी सुचना मिळाल्यानुसार आपला हरभरा केंद्रावर आणावा, असे आवाहन करण्यात आले. तालुक्यातील शेतकरी व पत्रकार यांनाही ऐनवेळी कार्यकमासाठी बोलावण्यात आले त्यामूळ यावल कृउबाव संबधीत यंत्रणेची आमदार हरिभाऊ जावळे यांनी चांगलीच काण उघाडणी केली. कृउबाचे माजी चेअरमन नारायण बापू चौधरी यांनी हरभरा मोजणीसाठी इलेक्ट्रॉनिक्स काटा अवलंब अशा सूचना करण्यात आली. पत्रकार अरुण पाटील यांचा यावेळी आमदार हरीभाऊ जावळे यांनी सत्कार केला.