यावल : शहरातील एका भागात राहणार्या 31 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी पंकज रमेश सोनवणे (31, रा.वढोदा, ता.यावल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. एका भागातील 31 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहते शिवाय त्यांचे कटलरीचे दुकान असून शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुकानावर असताना संशयीत आरोपी पंकज रमेश सोनवणे याने आठ दिवसांपूर्वी घेतलेली वस्तू परत करण्याच्या निमित्ताने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिलेने यावल पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपीची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. तपास हवालदार असलम खान दिलावर खान करीत आहेत.