यावलसह कोरपावली, नायगाव, डांभुर्णी गावात पाचव्या दिवसी विघ्नहर्त्या श्रीगणेशास उत्साहात ३२मंडळाच्या भक्तांनी दिला निरोप पोलीसाचा मोठा बंदोबस्त
यावल ( प्रतिनिधी ) गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने येथे आज शहरातील २० आणी तालुक्यातील डांभुर्णी येथे सहा श्रीगणेश मंडळाच्या वतीने व नायगाव आणी कोरपावली मधील एक गाव एक गणपती,दहिगावमध्ये तिन असे तालुक्यातील ९२ श्रीगणेश मंडळा पैक्की एकूण ३२ गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी ढोल,ताशे,झांज आणी बॅंड पथकांच्या सुमधुर तालावर तरूण गणेशभक्तांनी बेधुंद नाचत दिला श्रीगणेशाला उत्साहाच्या वातावरणात निरोप . या गावात पाचव्या दिवसी विघ्नहर्त्या श्रीचे विर्सजन दरम्यान कायद्या सुव्यवस्था राखण्याकामी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी हे प्रामुख्याने उपस्थित होते, त्याचप्रमाणे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी, जळगाव नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आसाराम मनोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक अनिनाश दहिफळे ,पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर पठान यांच्यासह १oपोलीस उपनिरिक्षक आणी २७५पोलीस कर्मचारी,एक एसआरपी पथक तर एक आरसीपीचे पथक व १५० गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांचा मोठा बंदोबस्त पाच दिवसाच्या श्रीगणेशाच्या विर्सजन ठेवण्यात आले होते यावल शहरात गणपती बाप्पाला अतिशय उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आले . यावल शहरातील गणपती विर्सजनाची मिरवणुक मात्र रात्री उशीरा पर्यंत शांतते च्या वातावरणात सुरू होती . उद्या रविवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी साकळी गावातील तिन श्रीगणेश मंडळा च्या वतीने श्रीचे विर्सजन करण्यात येणार आहे .