नवीन 11 तर जुन्या 20 गावातील आरक्षण
फैजपूर- उपविभागीय कार्यालय अंतर्गत यावल-रावेर तालुक्यातील पोलीस पाटील भरतीचे आरक्षण जाहिर झाले. यात एकूण 31 गावांचे आरक्षण प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबाले यांनी जाहीर केले. यावल-रावेर तालुक्यातील 36 जागांवर ही पोलीस पाटील परीक्षा घेण्यात आली होती. यावल-रावेर तालुक्यातील 36 जागांपैकी 16 उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. यात काही उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरलेच नसल्याने तसेच काही जागांवर उमेदवार नापास ठरल्याने या 20 रिक्त जागांवर तसेच नव्याने रावेर-यावल तालुक्यातील 11जागांची सोडत गुरुवार, 23 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आल्याची माहिती फैजपूर प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली. यात प्रामुख्याने ज्या गावात पोलीस पाटील पद महिलांसाठी राखीव होते त्या ठिकाणी खुले करण्यात आले आहे. यात महिलांसाठी 30 टक्के राखीव पोलीस पाटील आरक्षण काढण्यात आले आहे.
तालुकानिहाय आरक्षण व रीक्त पदे अशी, रावेर तालुका- बोहर्डी- अनुसूचित जाती, नांदूरखेडा- महिला अनुसूचित जमाती, खानापूर- खुला विमुक्त जाती अ, वाघोड- खुला भटकी जमाती अ, दोधे- खुला भटकी जमात, खिरवड-भटकी जमाती ब, तामसवाडी- खुला जनरल, नीमड्या- अनुसूचित जाती पेसा राखीव, मोहगण- खुला अनुसूचित जमाती, मोहमांडली- अनुसूचित जाती, पेसा राखीव, कुसुंबा खुर्द- अनुसूचित पेसा राखीव, लालमाती- खुला अनुसूचित जमाती पेसा, चिनावल-जनरल, मस्कावदसीम- इतर मागासवर्ग, कोचुर खुर्द- जनरल महिला, मंगरूळ- अनुसूचित जाती पेसा राखीव, थेरोळा-महिला इतर मागावर्गीय, रसलपूर-भटकी जमाती
यावल तालुक्यातील रिक्त पदे- भोरटेक-अनुसूचित जाती-जमाती, कोरपावली-अनुसूचित जाती-जमाती, निमगाव- महिला अनुसूचित जमाती, भालोद-विमुक्त जाती अ, राजोरा- भटकी जमात ब, बोरखेडा खुर्द- अनुसूचित जमाती, पिंपरूड- महिला इतर मागासवर्गीय, कठोरे प्र.सावदा-अनुसूचित जमाती, किनगाव बुद्रुक- महिला भटकी जमात क, वड्री-महिला अनुसूचित जाती, डोंगरकठोरा- अनुसूचित जाती, इचखेडा- महिला अनुसूचित जमाती, डांभुर्णी-जनरल