यावल- कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रविवारी आमदार हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते सीएम व्हॉलीबॉल स्पर्धेचे तसेच आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी जिल्हा परीषद सदस्या सविता अतुल भालेराव, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, रावेर सभापती माधुरी नेमाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन, संगायोचे अध्यक्ष विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे, मीना तडवींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे हाच उद्देश -आमदार
आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले की, तालुकास्तरावर स्पर्धेचे अयोजन करण्यामागे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन हाच मुख्य उद्येश आहे. महात्मा गांधी, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना अपेक्षित असलेल्या ग्रामीण भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी भाजपा शासन कटिबध्द असल्याचे सांगून त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शासन विविध संकल्पना राबत असल्याचे ते म्हणाले. र्स्प्धेच्या उद्घाटनापूर्वी आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या चित्ररथाचे पूजन आमदार जावळे व मीना तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. चित्र रथामध्ये बिरसा मुंडा यांच्या जीवन चरीत्रावर विविध चित्रे रेखाटली असून चित्ररथ आदिवासी भागासह तालुक्यात पाच दिवस भ्रमण करणार आहे. यामुुळे आदिवासी युवकांना निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यशस्वतेसाठी बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, भाजपा शहराध्यक्ष बाळू फेगडे, युवा तालुकाध्यक्ष लहु पाटील, युवा शहराध्यक्ष व्यंकटेश बारी, स्रेहल फिरके, रीतेश बारी, मयुर राणा यांनी परीश्रम घेत आहेत.