यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन शाळकरी मुलींला पाहुन अर्धनंग अवस्थेत हातवारे ईशारे करून लज्जा वाटेल असे कृत केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून , वयोवृद्ध संशयीत आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीला त्यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्ती दिनांक २५ सप्टेंबर सोमवारच्या दिवसी सदरची मुलगी ही दुपारच्या सुमारास शाळेतुन आल्यानंतर आपल्या घरी असतांना घराच्या मागील बाजुच्या अंगणात खेळत असतांना घराशेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीने सदर १२ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीकड़े पाहुन अर्धनंग अवस्थेत हातवारे करीत मुलीच्या मनाला लज्जा वाटेल असे ईशारे करीत कृत केले . सदरचा झालेला प्रकार मुलीने आपल्या आई,बाबा यांना सांगीतले, मुलीने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून त्या वयोवृद्ध व्यक्ती विरुद्ध लैंगीक गुन्ह्यापासुन बालकांचे सरंक्षण कायदा २०१२पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे , महिला पोलिस कर्मचारी सारीका वाणी व पोलिस करीत असुन ,संशयीत व्यक्तीस पोलीसांनी अटक केली आहे .