यावल आगारात चार शिवशाही बसेस दाखल

0
यावल:- यावल आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी चार नव्या शिवशाही आरामदायी बसेस उपलब्ध झाल्या ाहेत. लवकरच या बसेस लांब पल्ल्याच्या प्रवावासाठी सोडण्यात येणार आहेत.
रविवारी पहाटे 6.5 वाजता यावल-भुसावळ-औरंगाबादसाठी ट्रायल बस सोडण्यात येणार असून पुन्हा पुढील काही दिवसात दोन बसेस उपलब्ध होणार आहेत. आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते पूजन करून या बसेसचे उद्घाटन करण्यात आल्याचे यावल आगार व्यवस्थापक बंजारा म्हणाले.