यावल आदिवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या ५४ शासकीय व अनुदानित आदिवासी शाळाले६८१ शिक्षक देणार क्षमता चाचणी परिक्षा

यावल ( प्रतिनिधी ) जळगाव जिल्ह्यातील आदिवासी अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या १७ सप्टेंबर दिनांक २०२३ रविवार रोजी क्षमता चाचणी परिक्षा घेण्यात येणार आहे . यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या निर्णया अनुसार जळगाव जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांची क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे . या अनुषंगाने राज्य शासनाने घेतलेल्या निर्णया अनुसार जळगाव जिल्ह्यातील १७ शासकीय आश्रमशाळा तर३२ आश्रमशाळांमधील शिक्षकांची क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे .आश्रमशाळामधील शिक्षकांचा ज्ञान अद्यावत व्हावे, त्यांना स्वंयअध्यनाची आवड विकसीत व्हावी व स्पर्धात्मक वातावरण निर्मित होण्यासाठी ही क्षमता चाचणी घेण्यात येणार असुन , यासाठी महात्मा गांधी कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा हे निश्चित करण्यात आले असून , जळगाव जिल्ह्यातील ६८१ शिक्षक परिक्षासाठी बसणार आहे . या स्पर्धत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे व त्यांच्या कार्यपध्दतीचा इतर शिक्षकांसाठी अवलंब करण्यात येणार आहे . जळगाव जिल्हा प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांनी कोणतीही भिती न बाळगता परिक्षा मोठया संख्येत उपस्थित राहून द्यावी अशी माहीती एकात्मीक आदिवासी प्रकल्प विकास विभाग कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.