यावल एसटी बस आगारा व्यवस्थापक महाजन यांच्या सेवा वर्षपुर्ती कामगीरीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांनी केले सत्कार

यावल( प्रतिनिधी )येथील एसटी आगारातील सर्व कामगारांचे प्रिय असे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन या कर्तव्यदक्ष अधिकारी यांना एक वर्ष सेवापूर्ण झाल्या नित्ताने यावल आगारातील कामगार बंधू व भगिनी यांच्या वतीने आगारात प्रथमच पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात . यावल एसटी आगारात मागील एक वर्षाच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी पार पडणारे व सर्व कामगारांना सोबत घेऊन आपले आगार कसा उंच शिखरावर न्यावा हे सर्व आगार स्थापका कडून खरोखरच शिकायला पाहिजे..अशी भावना सहकारी कर्मचारी यांनी व्यक्त केली

सर्वात महत्त्वाचा विषय साहेबांचे चरणस्पर्श यावल आगारात कायम भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला यात महामंडळा च्या वरिष्ठ अधिकारी व कामगार बंधू व भगिनी यांचे सुद्धा श्रेय लाभले..

त्यातूनच अजून दुसरे विशेष असे की स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान योजना राबवितांना परिसरातील स्वयंसेवक यांच्या कडून त्यांना विनंती करून यावलच्या बस स्थानकाची सुंदर अशी रंगरंगोटी करून सुधारणा करीत बसस्थानकाचा कायापालट केला…त्यात सुद्धा आपल्या यावल आगाराला चांगले गुण मिळाल्याचे आगारप्रमुखांनी सांगीतले, आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या सेवावर्ष पुर्तीच्या निमित्ताने कामगारांना सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दिलीप महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना असेच येणाऱ्या पुढील काळात आपण सर्वांनी चिकाटीने महामंडळ आणि प्रवासी हिताच्या दृष्टीने कर्तव्य करीत आपण आपला यावल आगार उंच शिखरावर पोहोचवू या.. अशी अपेक्षा त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांकडून व्यक्त केली .