यावल कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश ‘अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी घेतली पंचप्रण शपथ
यावल ( प्रतिनिधी ) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी. पवार यांनी भारताची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांपासून आत्मनिर्भर आणि बलशाली राष्ट्र म्हणून उदयास सुरवात झाली आहे. भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र, देशाचा समृद्ध वारसा, देशाच्या संरक्षण करणाऱ्या प्रति सन्मान आदींसाठी देशाचे नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन करण्यासाठी प्रतिज्ञा करणे आद्य कर्तव्य आहे असे आव्हान केले.
क्रार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार, प्रा.संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थीनी तेजश्री कोलते (S.Y.B.A.) हिने शपथ दिली.
कार्यक्रमाला प्रा.डॉ. सुधीर कापडे,प्रा. डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा.एस.आर. गायकवाड, प्रा. मनोज पाटील,प्रा. सी. के.पाटील , प्रा. एकनाथ सावकारे, प्रा.अरुण सोनवणे, प्रा.राजु तडवी उपस्थित होते. तर डॉ. संतोष जाधव, प्रा. नंदकुमार बोदडे, प्रा. मिलिंद मोरे, प्रा. प्रशांत मोरे , प्रा. अर्जुन गाढे, प्रा. डॉ. निर्मला पवार, प्रा.डॉ. वैशाली कोष्टी, प्रा.ईश्वर पाटील, संतोष ठाकूर, मिलिंद बोरघडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते.