यावल- जळगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील संरक्षक भिंत पाडल्याच्या कारणावरून मंगळवारी व्यापार्यांनी बंद पुकारला होता तर या बंदला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापार्यांनी पाठिंबा देत मंगळवारी बंद पाळला होता. या बंदला यावल तालुका ग्रेन मर्चंड असोसिएशन च्या वतीने लेखी पाठिंबा देण्यात आला. बाजार समिती यावल यांनादेखील निवेदन देऊन बंद बाबत कळविण्यात आले. व्यापार्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असोसिएशन सदैव जिल्ह्यातील संघटनेसोबत होईल, असे अध्यक्ष अशोक चौधरी उपाध्यक्ष पुंजो पाटील सह सर्व व्यापार्यांनी सांगितले.