यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भानुदास चोपडे

0

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भानुदास चोपडे

उपसभापती पदासाठी कांचन फालक यांना संधी

यावल– कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पद हे ठरल्या प्रमाणे शिवसेनेकडे आले असून गुरुवारी सेनेचे भानुदास दगडू चोपडे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी भाजपच्या कांचन ताराचंद फालक यांची निवड करण्यात आली. बाजार समितीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता निवड प्रक्रिया झाली.

बिनविरोध निवडीनंतर जल्लोष
बाजार समितीच्या सभागृहात पीठासन अधिकारी सहाय्यक निबंधक टी.एच.लाटणे, सहाय्यक एम.पी.भारंबे व बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रीया झाली. सभापती पदा करीता शिवसेनेेच्या भानुदास चोपडे यांचा अर्ज होता तर उपसभापती पदा करीता भाजपच्या कांचन फालक यांचा असेे दोन्ही पदाकरीता एकच असल्याने दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. या सभेत पांडूरंग सराफ, मुन्ना पाटील, नारायण चौधरी, राकेश फेगडे, उमेश पाटील, विनोदकुमार पाटील, योगराज बर्‍हाटे, ज्योती सुनील नेवे, डॉ.नरेंद्र कोल्हे, अरूणा रामदास पाटील, नितीन चौधरी, सत्तार तडवी, उमेश बेंडाळे, अशोक चौधरी, पुंजो पाटील, सुनील बारी, हिरालाल चौधरी आदी संचालक उपस्थित होते.