यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उद्या शोकसभा

0

यावल : भाजपा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे मंगळवारी दुपारी मुंबईत कोरोना आजाराने निधन झाल्यानंतर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवार, 18 रोजी दुपारी चार वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन शिवसेना जिल्हा उपप्रमुख तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील यांनी केले आहे.