यावल-कोरपावली रस्त्याच्या कामानंतर ग्रामस्थांचे उपोषण मागे

0

यावल- यावल-कोरपावली रस्त्याच्या कामासाठी उपोषण छेडताच प्रशासन जागे झाले व कामाला सुरुवात झाल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी छेडलेल्या उपोषणाची सांगता झाली. कोरपावलीचे सरपंच जलील पटेल आणि ग्रामस्थांनी यावल ते कोरपावली विरावली मार्गे आणि यावल ते कोरपावली सूतगिरणीमार्गे हा रस्ता नवीन व्हावा आणि दोन्हीकडील रस्त्यावरील काटेरी झुडपे काढावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग, यावल यांच्या कार्यालयाच्या बाजूला 22 डिसेंबरपासून उपोषण छेडले होते. सार्वजनिक बांधकाम उप विभाग यावल निंबाळकर यांनी प्रत्येक्ष कामाला सुरुवात केली होती परंतु सुतगिरणीमार्गे कोरपावली जाणारा रस्ता हा जिल्हा परीषद बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत असल्याने रविवारी काँग्रेसचे जिल्हा परीषदेचे गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांच्या प्रयत्नाने रविवारी सुटीचा दिवस असून सुद्धा त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चा करून तिथं पाठवले व दोन दिवसात काम मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. कनिष्ठ अभियंता आर.पी. इंगळे यांनी आणि युवानेते संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे यांनी निंबुपाणी देऊन सरपंच जलील पटेल आणि ग्रामस्थांचे उपोषण सोडवले.

यांचा होता उपोषणात सहभाग
काँग्रेस शहराध्यक्ष कदिरखान, कोरपावलीच ईस्माईल तडवी, ग्रामपंचायत सदस्य सरफराज तडवी, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा भालेराव, संदीप बरसू नेहेते, नगरसेवक अस्लमशेख मनोहर सोनवणे, युवक काँग्रेस अध्यक्ष आलिभाई शेख, अनिल जंजाले, कोरपावलीचे अन्सार पटेल, वसीम तडवी, शरद भालेराव, सचिन भालेराव, प्रवीण भालेराव, मोहराळ्याचे राजेंद्र महाजन, विरावलीचे नानाजी पाटील, चुंचाळे पोलिस पाटील गणेश पाटील, विनोद पाटील, कोरपावलीचे तलाठी तायडे, कय्युम पटेल, अमोल तायडे आदी उपस्थित होते.