यावल। येथील चोपडा नाक्यापासुन ते थेट तहसिल कार्यालयावर ऑल इंडीया मुलनिवासी बहूजन समाज सेंट्रल संघ व आंबेडकराईड पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी विविध मागण्याच्या घोषणा देत बुधवार 23 रोजी दुपारी 2 वाजेला निघालेला मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकत निवेदन देण्यात आले.
हक्काची घरे द्यावी
सातपुड्यातील आंबापाणी येथील आदिवासी बांधवांच्या झोपड्या 19 जुन रोजी वनविभागाने पुर्वसुचना न देता जाळून टाकल्या तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. आदिवासी कुटुंबीयांना घरं द्यावी या प्रमुख मागणीसह ऑल इंडीया मुलनिवासी बहूजन समाज सेंट्रल संघ व आंबेडकराईड पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
यांची होती उपस्थिती
मोर्चाचे नेतृत्व प्रदेश सचिव कैलास पगारे यांनी केले. यात पंजाबराव खंडारे, सतिष अडकमोल, राजु तडवी, रमजान तडवी, निलेश बारेला, सोमेश वानखेडे, रोहिदास अडकमोल, रूपसिंग बारेला, विष्णू भारदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.