भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसची वादात उडी ; राजकीय वर्तुळात खळबळ
यावल- यावल तहसीलच्या प्रशासकीय नवीन ईमारतीचा ई-लोकार्पण कार्यक्रम चांगलाच वादाच्या भोवर्यात अडकला आहे. यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचा गोंधळलेल्या कारभारासह बांधकाम ठेकेदार यांच्यातील समन्वयाअभावी या लोकार्पण कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगत आहे. या सर्व गोंधळलेल्या वातावरणात आदी भाजपाचे पदाधिकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे.
दोन ठिकाणी प्रशासकीय ईमारतीचे लोकार्पण कसे ?
संदर्भात काँग्रेसचे पंचायत समितीचे विरोधी गटनेते शेखर सोपान पाटील व राष्ट्रवादीचे यावल तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली दोघा पक्षातील पदाधिकार्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभीयंता निंबाळकर व कार्यालयीन लिपीक वाघ यांना तक्रारीचे निवेदन दिले असून प्रशासकीय ईमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमातून विरोधी पक्षाला हेतु पुरसपर डावलण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. एकाच प्रशासकीय ईमारतीचे दोन वेळा लोकार्पण कसे करण्यात आले ? असा जाब विचारण्यात आला आहे. अशा प्रकारे दोन- दोन ठिकाणी प्रशासकीय ईमारतीचे लोकार्पण कसे होवू शकते ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील जर जळगावहुन ई लोकापर्ण करणार होते तर मग यावल येथे मोठा मंडप टाकण्याचे गरज काय होती? असा प्रश्न कार्यक्रमाच्या दिवशी भाजपाचे कार्यकर्त व आता विरोधी पक्षाचे कार्यकर्ते अधिकारी यांना विचारीत आहेफ अशा प्रकारे कार्यक्रम घडवून आणणे हा एका प्रकारे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा अपमान नाही का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची यांची तत्काळ चौकशी करण्यात येवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, काँग्रेसचे पंचायत समिती विरोधी गटनेते शेखर सोपान पाटील, काँग्रेसचे रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख शेख अलीम मो.रफीक, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, राष्ट्रवादीचे कामराज घारू, गणेश चोपडे, राजु पिंजारी, अमोल भिरूड, प्रवीण घोडके, अशपाक शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्त यावेळी उपस्थित होते.