भुसावळसह यावल व बोदवड तहसील कार्यालयाच्या कर्मचार्यांमध्ये हळहळ
भुसावळ : यावल तहसील कार्यालयात आवक-जावक विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या 35 वर्षीय कर्मचार्याचा भुसावळात अपार्टमेंटमधील लिप्टच्या डकमध्ये पडल्याने मृत्यू झाल्याची बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या घटनेनंतर भुसावळसह यावल व बोदवड तहसील कार्यालयाच्या कर्मचार्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात. प्रशांत अशोक पाटील (वय 35) असे मृत लिपिकाचे नाव आहे. अत्यवस्थ अवस्थेत नशिराबादजवळील गोदावरी रुग्णालयात त्यास हलवण्यात आले असता रात्री 9.27 वाजता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.