यावल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा व्हेंटिलेटरवर

0

यावल । तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये जिल्हा परिषद सदस्थ यांनी अचानक भेट दिली असता जिल्हा परिषदेच्या शाळा या व्हेटीलेटरवर दिसत आहे. भालोद-पाडळसा गटातील जिल्हा परिषद सदस्य नंदा सपकाळे यांनी यावल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भालोद, अट्रावल, सांगवी, राजोरा, निमगाव या शाळेंना अचानक भेट दिल्याने शाळेमध्ये विद्यार्थी संख्या पटावर 17 असून हजर विद्यार्थी 11 असल्याचे निदर्शनात आले असून त्या ठिकाणी एकही स्थानिक विद्यार्थी नसून सर्वे पवार समाजाचे विद्यार्थी होते.

पटसंख्येवर परिणाम
ज्या शाळेमध्ये मधुकरराव चौधरी, आमदार हरिभाऊ जावळे यांसारखे विद्यार्थी शिकत असतांना या शाळेत डॉ. बाबासाहेब आबेडकरानी भेट दिली होती. ती जिल्हा परिषदेची शाळा आज विद्यार्थी नसल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनेक प्रश्नांनी ही शाळा भरकटलेली आहे. खाजगी शाळांना ज्या सुविधा दिल्या जात आहे त्या सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांना नसल्यामुळे विद्यार्थाच्या संख्येवर परिणाम होत आहे.

दर्जा सुधारावा
यासाठी जिल्हा परिषद सदस्था नंदा सपकाळे यांनी पुढाकार घेऊन शाळेतील परिस्थिती स्वतः जाऊन पाहिली शाळा सुरू ठेवण्यासाठी खाजगी शाळेची परवानगी बंद करण्याशिवाय जिल्हा परिषद शाळा सुरू राहणार नाही हे लक्षात आल्यावर यासाठी खाजगी शाळा परवानगी बंद करण्याची मागणी नंदा सपकाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे.