यावल तालुक्यातील तीन हजार 300 जातीच्या वृक्षांची होणार लावगड

0

67 ग्रामपंचायतींना उद्दिष्ट ; पर्यावरण समतोल गरजेचा -प्रज्ञा वडमारे

यावल- निसर्गासह पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक व सामाजिक जबाबदारी व कर्त्यव्य आहे. देशाच्या व आपल्या राज्याचा बिघडलेला समतोल राखण्याची प्रत्येक पर्यावरण प्रेमी व नागरीकांची जवाबदारी असल्याचे मत सामाजक वनीकरणाच्या वनक्षेत्रपाल प्रज्ञा वडमारे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना यावेळी प्रत्येकी तीन हजार 300 असे विविध जातीचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून यावल तालुक्यातील एकूण 67 ग्रामपंचायतींचा यात समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाने यावर्षी संपूर्ण राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचा उद्दीष्ट ठेवले आहे.

या वृक्षांचा आहे समावेश
यावल सामाजिक वनीकरणाच्या कक्षेत यावर्षी ज्या विविध जातींच्या वृक्षांच्या वृक्षांचा समावेश करण्यात आला असून त्यात- रोपवाटीकेतील लहान रोपांची संख्या बांबू 41 हजार 800, शिबू 55 हजार 200, आवळा 19 हजार 800, खैर सहा हजार 500, निंब एक हजार, फापडा एक हजार 600 व शिवण दोन हजार 200 अशी एकूण एक लाख 50 हजार वृक्षांची रोपे उपलब्ध असल्याचे प्रज्ञा वडमारे म्हणाल्या. या शिवाय 1 ऑगस्ट 2018 पर्यंत सुमारे 60 हजार लहान रोपे शिल्लक आहे. यात गुलमोहर, सुनमोहर, आवळा, निम, सिताफळ, अंजन, जांभुळ, बदाम, काशीद, सिसु, सिसम, रेन्द्री अशी रोपे वाटीकेत आहेत. सामाजिक वनीकरणच्या या रोपवाटीकेत कार्यरत असलेले वनपाल डी.बी.तडवी, रोपवाटीका वनपाल अशोक पाटील, त्याच बरोबर वनमजुर जी.बी.बाविस्कर, एम.एस.सावकारे, एस.एन.पिंजारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व परीश्रम घेत आहेत.