यावल प्रतिनिधी l
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणा जवळ दोघ मुले गुरे धरणाच्या पाण्यात जात असल्याची पाहुन त्यातील एक मुलगा हा गुराला पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी गेला असता तो बुडू लागला हे पाहून दुसऱ्या मुलाने पाण्यात उडी घेतली पण त्याचा धरणातील पाण्याचा अंदाज चुकल्याने दोघ ही पाण्यात बुड्डन मरण पावले . दोघ आदीवासी मुले पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटनासमोर आल्याने , वेगाने शोध कार्य करीत चार तासात बुडालेल्या दोघ मुलांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले .
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील निंबा देवी धरण आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते तर सध्या कडाक्याचे ऊन असल्याने अनेक जण निंबा देवी धरणात पोहण्यासाठी येत असून याचप्रमाणे तालुक्यातील सावखेडा सिम गावा जवळचे आदिवासी वस्तीत राहणारे नेनु किसन बारेला वय 10 वर्ष व आसाराम शांतीलाल बारेला वय 14 वर्ष हे काल धरणाजवळ गुरे चारण्यासाठी गेले असता पाण्यातील गुरांना बाहेर काढण्याच्या बेतात असतांना पाण्याचा अंदाज चुकल्याने या दोघ मुलांचा धरणाच्या पाण्यात बुडाली सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघे बालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघ मुलांचा मृतदेह पाण्यातून काढण्यात आला मरण पावलेली दोघ मुले हे नात्याने काका पुतणी लागतात तर हे दोघ ही वाघझिरा आदीवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी होते.
मरण पावलेल्या दोघ बालकांच्या मृतदेहावर यावल च्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . दोघ लहान मुलांचा अशा प्रकारे मृत्यूमुळे सावखेडा सिम तालुका यावल परिसरातील आदिवासी बांधव नागरिकांमध्ये एकच शोककळा पसरली आहे .