यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील एका 20 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील 20 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती व तिची नणंद मंगळवारी सकाळी 11 वाजेला गावातील हौदावर धुणे धुत असतांना संशयीत आरोपी जहांगीर तडवी (बोरखेडा, ता. यावल) याने अश्लील वर्तन करीत लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. हा प्रकार आपल्या पतीसह कुटुंबास पीडीतेने सांगितल्यानंतर रात्री उशिरा यावल पोलिसात जहांगीर तडवीविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे.